नागपूर,दि.13: नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमासोबत बोलताना दिली. सरकारच्या निर्णयामुळे झोपडपट्टीधारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोलापूरसह संपूर्ण राज्यातील झोपडपट्टीधारांना सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. झोपडपट्टीधारांना मालकी हक्क पट्टे देणार असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
एकूण अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. “झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजेत अशी गेल्या 30- 40 वर्षांपासून साततत्याने मागणी होत होती. 2014 ला मुख्यमंत्री असताना काही निर्णय घेतले होते. तेव्हाही पट्टेवाटप सुरु केलं होतं. पण 2019 नंतर पूर्ण थांबलं होतं. आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले. सगळ्या जमिनींवर मालकी हक्क देता येईल असा निर्णय आम्ही घेतला,” असं देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
गेल्या 30- 40 वर्षांपासून साततत्याने मागणी होत होती. यासाठी संघर्ष केलाय, 2014 ला मुख्यमंत्री असताना काही निर्णय घेतले होते. पण 2019 नंतर पूर्ण थांबलं होतं. त्याही वेळेस पट्टेवाटप सुरू केले होते. आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले. नागपूर मॉडेलचा जीआर आता संपूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे. एमएमआर वगळता महाराष्ट्रात जिथे जिथे झोपडपट्टीत लोक आहेत, त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे दिले जातील, असे फडणवीस म्हणाले.
“आज एक हजार लोकांना मालकी हक्काचे पट्टे दिले. एकूण अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होईल. नागपूर मॉडेल आम्ही तयार केल आहे. त्याचा जीआर आम्ही आता पूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे. मुंबईत एमएमआरडीए मध्ये एसआरए करतो म्हणून त्यांना वगळता महाराष्ट्रात जिथे-जिथे झोपडपट्टीत लोक आहेत तिथे सगळीकडे ही जीआर लागू असेल,” असं त्यांनी सांगितलं.







