Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समान नागरी कायदाबद्दल मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis On Uniform Civil Code: राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू

0

मुंबई,दि.30: Devendra Fadnavis On Uniform Civil Code: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समान नागरी कायदाबद्दल (Uniform Civil Code) मोठं वक्तव्य केलं आहे. गुजरातमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राज्यात समान नागरी कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, ”संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. काही कारणांमुळे आपल्या देशात हे होऊ शकलं नाही. आता हा कायदा गोव्यात आहे. उत्तराखंड देखील हा कायदा लागू करणार आहे. हिमाचल करणार आहे, गुजरात देखील करणार आहे. मला वाटतं हळूहळू सगळेच राज्य हे करणार आहेत. महाराष्ट्रही योग्य वेळी याचा विचार करणार.”

हेही वाचा Doctor Kalpana Nanjkar: मूळव्याधचा आयुष्यात एकदा तरी त्रास होतोच; मूळव्याध लक्षणे व उपाय

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”आज मी याबद्दल अधिकृत घोषणा नाही करू शकत. याच कारण म्हणजे अशी कोणतीही घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्रीला असतो. मात्र मला असं वाटतं संविधानाने आपल्यावर ही जबाबदारी टाकली आहे की, आपण आपल्या राज्यात समान नागरी कायदा आणावा.”

यावरच बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. याचा सर्व राज्यांनी विचार करावा. त्याची अंमलबजावणी करणारी राज्ये अभिनंदनास पात्र आहेत. एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी श्रद्धा हत्याकांडावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजनाथ सिंह म्हणाले की, हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीचा उत्साह कायम आहे. गुजरातमध्येच नव्हे तर केंद्रातही मोदी सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही गुजरात जिंकतोय, येथे केलेल्या कामगिरीच्या आधारे आम्ही विभाज्य मिळवू. पंतप्रधानांचा देशभर दौरा पाहा. ते खूप मेहनत करतात. त्याचा परिणाम म्हणजे देशाची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे. राहुल गांधींनी देखील यात्रा सुरू केली आहे, पाहूया काय होतंय ते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here