अजित पवार यांचा व्हिडीओ शेअर करत मनसेची टीका

0

मुंबई,दि.7: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टीका केली आहे. कालच (दि.6) निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून घोषीत केले आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी पक्ष व चिन्हावर दावा केला होता. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाही यापूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही 10 जानेवारीला शिंदे यांचीच शिवसेना असा निकाल दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेवर दावा सांगितल्यानंतर त्यावेळी अजित पवार यांनी टीका केली होती.

तसेच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना म्हणून घोषीत केल्यानंतरही अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात असताना अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आहे.

मनसेने अजित पवारांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अजित पवार निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यावर टीका करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून मनसेने अजित पवारांना त्यांच्यात टीकेची आणि सध्याच्या परिस्थितीची आठवण करुन दिली आहे. 

हा व्हिडीओ पोस्ट करताना ‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? अशी विचारणा केली आहे. 

“ज्याच्या वडिलांनी पक्ष काढला, वाढवला, महाराष्ट्रात सर्व दूरपर्यंत नेला त्यांचाच पक्ष, चिन्ह काढून घेतलं. जरी निवडणूक आयोगाने दिलं असलं तरी जनतेला पटल आहे का याचाही विचार करायला हवा. तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, कोणी अडवलं होतं?,” असं अजित पवार या व्हिडीओत बोलताना ऐकू येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here