Crime News: WhatsApp ग्रुपमधून काढल्यामुळे ग्रुप ॲडमिनला बेदम मारहाण, जीभ कापली

Pune Crime: ॲडमिनला बेदम मारहाण

0

पुणे,दि.3: Crime News: WhatsApp काढल्यामुळे अ‍ॅडमिनला (Admin) बेदम मारहाण करत जीभच कापल्याची घटना घडली आहे. पुण्यातील फुरसुंगी (Fursungi) भागात व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याची धक्कदायक घटना घडली आहे. (Pune Crime) हॅपी न्यूअर म्हटलं नाही म्हणून पुण्यात एकाचा हात तोडल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.

काय आहे नेमका प्रकार? | Pune Crime

पुण्यातील फुरसुंगीत हा भयंकर प्रकार घडला आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत अ‍ॅडमिनची जीभच कापली गेली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा Siddheshwar Swami: ज्ञानयोगी आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामी लिंगैक्य

प्रीती किरण हरपळे (वय-38) यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 28 डिसेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारस घडला आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉटसॲप ग्रुपमधून एका व्यक्तीला रिमूव्ह केलं | Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दाम्पत्य आणि आरोपी एकाच सोसायटीत राहण्यास आहेत. सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने ओम हाईट्स ऑपरेशन या नावाने व्हॉट्सअप ग्रुप काढला होता. त्यात सर्व सदस्य होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अ‍ॅडमिन होते. दरम्यान, त्यांनी या ग्रुपमधून सोसायटीतील एका व्यक्तीला रिमूव्ह केलं. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी रिमूव्ह का केले असा मॅसेज तक्रारदारांच्या पतीला व्हॉट्सॲपला टाकून विचारणा केली. पण, त्यालाही तक्रारदार यांच्या पतीने उत्तर दिलं नाही.

Crime News
व्हॉट्सॲप ग्रुप

ॲडमिनला बेदम मारहाण

त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले. तक्रारदार आणि त्यांचे पती ऑफिसमध्ये असताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी ग्रुपमधुन मला का काढून टाकल असे विचारणा केली. त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मॅसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचं सांगितलं, यावरुन संतापलेल्या पाच जणांनी तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर मारहाण केल्याने तक्रारदारांची जीभ कापली गेली आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here