Covishield Vaccine: नवीन संशोधनातून कोविशिल्ड लसी बाबत महत्वाची माहिती आली समोर

0

Covishield Vaccine Booster Dose: भारतात (India) सर्वाधिक नागरिकांना कोविशिल्ड लस (Covishield) दिली आहे. कोरोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनने (Omicron) अनेक देशात कहर केला आहे. भारतातही ओमिक्रॉनची (Omicron) रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात लसीकरण (Vaccination) सुरु आहे. नवीन वेरियंट ओमिक्रॉनचे रुग्ण देशात वाढत असताना, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका संशोधनाने दिलासा निर्माण झाला आहे.

अभ्यासानुसार ॲस्ट्राझेनेका लसीच्या बूस्टर डोससह ओमिक्रॉन विरूद्ध अँटिबॉडीत लक्षणीय वाढ होते. म्हणजेच AstraZeneca चा बूस्टर डोस घेणाऱ्यांना Omicron संसर्ग करू शकणार नाही. हा अभ्यास विशेषत: भारतासाठी ही चांगली बातमी आहे. कारण देशातील जवळपास ९० टक्के लस ही AstraZeneca ची दिली जात आहे म्हणजेच कोविशिल्ड दिली जातेय.

कोरोना व्हायरस (Corona Virus) लसीचा बूस्टर डोस व्हॅक्सझेव्हरियामुळे ओमिक्रॉन विरूद्ध उच्च पातळीची अँटीबॉडी तयार करत आहे, असे ब्रिटीश फार्मा कंपनी एस्ट्राझेनेकाने गुरुवारी सांगितले. ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.

ज्यांनी ॲस्ट्राझेनेका लसीचा बूस्टर डोस (म्हणजे तिसरा डोस) घेतला, त्या ४१ नागरिकांच्या रक्त नमुन्यांचे विश्लेषण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केले. कोरोना व्हायरसपासून बरे झालेल्या नागरिकांच्या रक्त नमुन्यांशी त्यांची तुलना केली गेली. म्हणजेच ज्यांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती. यासाठी, फक्त अशा लोकांचे नमुने घेण्यात आले, ज्यांना करोनाच्या चिंता वाढविणाऱ्या वेरियंटचा संसर्ग झाला आहे, म्हणजेच वेरिएंट ऑफ कन्सर्न (जसे अल्फा, डेल्टा इ.).

दुसऱ्या डोसनंतर, बूस्टर डोस घेत असलेल्यांमध्ये ओमिक्रॉन विरुद्ध खूप मजबूत अँटीबॉडी तयार होते. ‘तिसर्‍या डोसनंतर, नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीजची पातळी पूर्वी कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांपेक्षा (अल्फा, बीटा, डेल्टा किंवा वुहानमध्ये सापडलेल्या मूळ प्रकारांमधून) जास्त होती आणि ते बरेही झाले होते आणि कुठल्याही उपचाराशिवायत ते स्वतःच बरे झाले’, असे अभ्यासातील डेटाची माहिती देत AstraZeneca ने सांगितले.

AstraZeneca लस ही ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) उत्पादित केले जाते. ही लस भारतात कोविशिल्ड (Covishield) या ब्रँड नावाने उपलब्ध आहे. देशातील आतापर्यंतच्या देण्यात आलेल्या सर्व करोना लसींपैकी सुमारे ९० टक्के लस ही कोविशिल्डची दिली गेली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here