कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट भारतात आढळला, जाणून घ्या कितपत धोका?

0

मुंबई,दि.१६: कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट भारतात आढळला आहे. जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना अद्याप संपलेला नाही. गेल्या काही काळापासून जगभरातील कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. अनेक वेळा या व्हायरसच्या विविध प्रकारांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. याच दरम्यान, याबाबत लोकांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. चीनमध्ये, जिथे ही महामारी सुरू झाली होती, तिथे आता कोरोनाचा नवीन सबव्हेरिएंट JN.1 ची प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

कोरोनाचे हा नवीन सबव्हेरिएंट सर्वप्रथम लक्जबर्गमध्ये आढळला. त्यानंतर यूके, आइसलँड, फ्रान्स आणि अमेरिकेतही त्याची प्रकरणे दिसू लागली. भारतातच कोरोनाच्या या सबव्हेरिएंटचं एक प्रकरण समोर आलं आहे. केरळमध्ये या नवीन सबव्हेरिएंट JN.1 ची पुष्टी झाली आहे. ही बाब समोर येताच सर्वांच्याच चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, कोरोनाचे हा सबव्हेरिएंट ओमायक्रॉन सव्हेरिएंट BA.2.86 चे वंशज आहे, ज्याला ‘पिरोला’ असंही म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, JN.1 आणि BA.2.86 मध्ये फक्त एकच बदल आहे आणि तो म्हणजे स्पाइक प्रोटीनमधील बदल. स्पाइक प्रोटीन देखील स्पाइक म्हणून ओळखले जातो. हे व्हायरसच्या पृष्ठभागावर लहान स्पाइक्ससारखे दिसते. या कारणास्तव, लोकांमध्ये व्हायरसचा संसर्ग अधिक वेगाने होतो.

JN.1 ची लक्षणं काय?

सीडीसीच्या मते, कोरोनाच्या या नवीन सबव्हेरिएंटची कोणतीही विशिष्ट लक्षणं अद्याप दिसलेली नाहीत. अशा परिस्थितीत, त्याची लक्षणं कोविड-19 च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत की नाही हे शोधणे कठीण आहे. जर आपण कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, सतत खोकला, पटकन थकवा, नाक वाहणं, अतिसार, डोकेदुखी यांचा समावेश आहे.

JN.1 व्हेरिएंट किती धोकादायक?

सध्या, JN.1 बाबत कोणतीही तपशीलवार माहिती समोर आलेली नाही. सीडीसीच्या मते, या प्रकाराची वाढती प्रकरणे पाहता, असं म्हटलं जाऊ शकतं की एकतर तो अधिक संसर्गजन्य आहे किंवा तो आपल्या रोगप्रतिकारक शक्तीपासून सहजपणे सुटू शकतो. सध्या जेएन.1 हा कोरोनाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आहे की नाही याचा कोणताही पुरावा नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here