अक्कनबळग महिला मंडळातर्फे कोरोना योध्यांचा सन्मान

0

सोलापूर,दि.24 : कोरोनासारख्या भीषण महामारीच्या काळात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता कोरोनाबाधितांच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या 35 कोरोना योद्ध्यांचा अक्कनबळग महिला मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मंचावर अक्कनबळग महिला मंडळाच्या ट्रस्ट अध्यक्षा सुरेखा बावी, उत्सव अध्यक्षा तारा कोनापुरे, सचिवा रंजिता चाकोते, माजी नगरसेवक जगदीश पाटील, कांचन फौंडेशनचे अध्यक्ष सुदीप चाकोते उपस्थित होते.

यावेळी कोरोनाच्या काळात सेवा बजावलेल्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचारिका, लॅब टेक्नीशियन, सफाई कर्मचारी आणि इतर स्वयंसेवक अशा 35 जणांचा यावेळी सन्मानपत्र, सतरंजी, ब्लँकेट आणि मिठाई बॉक्स देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच कोरोना काळात मोठया प्रमाणात मदतकार्य केलेले सुदीप चाकोते यांची काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना राज्यपालांकडून कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास मंगला कोनापुरे, विद्या जोडभावी, मीना थोबडे, सुरेखा घटोळे, निर्मला किणगी, रमा कनाळे, चित्रा वनेरकर, रूपाली घोंगडे, स्मिता चांदणे, भानू नाईक, सुचेता थोबडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रंजिता चाकोते यांनी केले. वर्षा विभुते व प्रार्थना बिज्जरगी यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन काजल सिंदगी यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन प्रियंका हत्ती यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here