सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीणमध्ये आढळले कोरोना रुग्ण

0

सोलापूर,दि.18: सोलापूर शहर व जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळत आहेत. सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नुकसान कमी झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता.

सोलापूर शहर 334 अहवाल प्राप्त झाले. यात 329 निगेटिव्ह तर 5 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 3 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 19 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 1 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33689 झाली आहे. तर यापैकी 32165 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1505 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 960 पुरुष व 545 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 108 अहवाल प्राप्त झाले, यात 105 निगेटिव्ह तर 3 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 0 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 1 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 186086 झाली आहे. तर यापैकी 182354 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3726 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2420 पुरुष व 1306 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा कोरोना अहवाल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here