Corona pandemic: अमेरिकन शास्त्रज्ञाने सांगितले कोरोनाचे संकट कधी संपणार

0

दि.17: Corona pandemic: कोरानाने (Covid-19) अनेक देशात हाहाकार उडाला होता. कोरोनाचे नवनवीन येणाऱ्या व्हेरीयंटमुळे शास्त्रज्ञांपुढे मोठे आव्हान होते. अशातच कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. भारतासह जगभरातील अनेक देश या संसर्गाशी लढा देत आहेत. कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार लोकांना झपाट्याने संक्रमित करत आहे. दरम्यान, एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अलीकडेच, वॉशिंग्टनचे शास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद (Dr Kutub Mahmud) म्हणाले की, ही महामारी कायमची राहू शकत नाही आणि तिचा अंत अगदी जवळ आला आहे. डॉ. कुतुब असेही म्हणाले की बुद्धिबळाच्या या खेळात कोणीही विजेता नसतो, हा सामना अनिर्णित असल्यासारखा असतो, जिथे व्हायरस लपून बसतो आणि आम्ही खरोखर जिंकू आणि लवकरच फेसमास्कपासून मुक्त होऊ. तर, आशा आहे की आम्ही पुन्हा पुढे जाऊ.

जसजसे हे वर्ष पुढे सरकत जाईल, तसतसे आपण या महामारीतून बाहेर पडत जाऊ, असेही डॉ. कुतूब म्हणाले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. कुतूब बोलत होते. लसीकरण हे कोरोनाविरुद्ध लढ्याचे सर्वात मजबूत शस्त्र आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

भारतात 16 जानेवारी 2021 रोजी सुरू झालेल्या देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनापर्यंत 156 कोटी लस देण्याचा भारताने एक नवीन विक्रम केला आहे. आपण बचावासाठी मास्क, हँड सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहोत. लस, अँटिव्हायरल आणि अँटिबॉडिज् ही आयुधे आपल्याकडे आहेत. विषाणूकडे उत्परिवर्तनाचे शस्त्र आहे. आपले (मानवाचे) लस हे विषाणूविरुद्धच्या लढ्यातील सर्वाधिक परिणामकारक शस्त्र आहे. त्यामुळेच मला 60 टक्के लसीकरणाचे ध्येय गाठल्याबद्दल भारत सरकारचे कौतुक करावेसे वाटते, असे डॉ. कुतूब यांनी सांगितले.

विषाणूसाठी आणि मानवासाठीही अस्तित्वाची लढाई असते. विषाणूसमोर उत्परिवर्तित होण्याचे आव्हान असते तसेच मानवाच्या बदलत्या प्रतिकारकशक्‍तीशी जुळवून घेण्याचेे आव्हान असते. उत्परिवर्तनात विषाणू आपले रूप बदलतो आणि त्या-त्या हिशेबाने मानवाच्या प्रतिकारकशक्‍तीतही अपेक्षित बदल होत जातो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here