Corona: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीवर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त

0

मुंबई,दि.२७: Corona: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील २२ जिल्ह्यांतील कोरोना (Corona Pandemic) परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत राज्यात अनेक दिवसांपासून वाढ होत आहे. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २३.८२ टक्के इतका असून, त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्चांकी पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केली आहे.

कोरानाच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात रुग्ण संख्येत (Corona Cases In Maharashtra) वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त होती, त्यामानाने तिसऱ्या लाटेदरम्यान मृतांची संख्या कमी झालेली असली, तरी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेटबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट २३. ८२ टक्के असून, त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. त्यावर मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केल्याचे समजते.

राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही आणि या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि चाचण्यांचा वेग वाढवण्यासह कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्याच्या आवश्यकतेवर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिक भर देण्यात आला.

उच्च पॉझिटिव्हिटी रेटच्या यादीत राज्याची उपराजधानी नागपूर पहिल्या स्थानी आहे. नागपुरात पॉझिटिव्हिटी रेट ४४.५९ टक्के, पुणे ४२.४९ टक्के, नाशिक ४०. ९४ टक्के, गडचिरोली ३९.१८ टक्के, वर्धा ३८.११ टक्के, अकोला ३५.३१ टक्के, नांदेड ३४.४६ टक्के, वाशिम ३३.९४ टक्के, औरंगाबाद ३३.३४ टक्के, सांगली ३१.८९ टक्के, चंद्रपूर ३१.१८ टक्के, नंदुरबार २९.८५ टक्के, सातारा २९. ३१ टक्के, लातूर २८.९४ टक्के, सोलापूर २७.४१ टक्के, सिंधुदुर्ग २६. ९८ टक्के, भंडारा २६ टक्के, यवतमाळ २५.६७ टक्के, अमरावती २४.९३ टक्के, कोल्हापूर २४.६१ टक्के, गोंदिया २४.०५ टक्के आणि उस्मानाबादमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा २४. ०२ टक्के इतका आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here