Atique Ahmed: काँग्रेसच्या नेत्याची कुख्यात गुंड अतीक अहमदला भारतरत्न देण्याची मागणी

0

प्रयागराज,दि.19: काँग्रेसच्या नेत्यानी कुख्यात गुंड अतीक अहमदला (Atique Ahmed) भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. कुख्यात गुंड अतीक अहमद याची पोलिसांच्या गराड्यातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर त्याचा आणि त्याच्या भावाचा मृतदेह दफन करण्यात आला. अतिक हा एक माफिया होता, तसेच त्याच्यावर पोलिसांत 100 हून अधिक केसेस दाखल होत्या. याच अतिकला शहीद असा दर्जा देण्याची मागणी एका काँग्रेस नेत्याने केली आहे. अतीकच्या कबरीवर काँग्रेसच्या नगरपरिषदेच्या उमेदवाराने तिरंगा ठेवून अतीकला शहीद म्हणत भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काँग्रेसने त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. 

काँग्रेस उमेदवाराचा विचित्र प्रकार | Atique Ahmed

उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक निवडणुका आहेत. यामध्ये काँग्रेसने उमेदवारी दिलेला राजकुमार उर्फ रज्जू भैया या उमेदवाराने हा प्रकार केला आहे. माफिया अतीकला त्याने शहीद असल्याचे म्हटले आहे. अतीकच्या कबरीवर जाऊन तिरंगा लपेटला आणि त्याला सलामी देखील दिली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तो अतीकला शहीदचा दर्जा मिळवून देणार असल्याचे म्हणत आहे.

ही विचित्र मागणी प्रयागराजच्या वॉर्ड क्रमांक 43 (दक्षिण मलाका) मधून निवडणूक लढणारे राजकुमार सिंह उर्फ रज्जू यांनी केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या मागणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या मागणीनंतर काँग्रेसने रज्जू यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे.

ही घटना समोर आल्यानंतर प्रयागराज पोलिसांनी प्रयागराजच्या नगरसेवकपदाच्या उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी राजकुमारला ताब्यात घेतले आहे. 16 एप्रिल रोजी, अतीक-अश्रफ यांना प्रयागराजच्या कासारी-मासारी स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते. आता त्याची कबर देखील पोलिसांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 

बीडमध्ये शहीदचे बॅनर लावण्यात आले होते. असेच एक विचित्र प्रकरण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडले आहे. माजलगाव शहरातील भर चौकात अतीक अहमद याचा बॅनर लावण्यात आला होता, त्यावर शहीद असे लिहिले होते. बॅनर पाहून लोक संतापले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात बॅनर हटवून दोघांना अटक केली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here