मुंबई,दि.27: काँग्रेसची 14 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने (ठाकरे गट) अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते उद्या (दि.28) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आता या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार की शिवसेना आपला उमेदवार मागे घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या यादीत चौदा उमेदवारांचा समावेश आहे. तर याआधी अंधेरी जाहीर केलेल्या नावात बदल केला आहे. याआधी सचिन सावंत यांच्या नावाची घोषणा केली होती. आता या जागेवर अशोक जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर पंढरपूर विधानसभेसाठी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अंधेरी पश्चिम येथे आधी काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर केली होती, पण त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला त्यामुळे आता काँग्रेसने अशोक जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. वरोरामधून प्रवीण काकडे यांना तिकिट जाहीर केले आहे. तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून संदीप पांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.