सोलापूर,दि.12: Cold Wave Maharashtra: हवामान विभागाने सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना थंडीचा इशारा दिला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात घट होत असून थंडी वाढली आहे. सोलापुरात काल किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांत राज्यातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन दिवसांसाठी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला थंडीचा यलो अलर्ट जारी केला आहे.
उत्तरेकडून वेगाने थंड वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमान सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी नोंदवले जाईल. हवामान विभागाने पुढील 48 तासांत थंडीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील 14 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार
पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर आणि पुणे
विदर्भ: गोंदिया आणि नागपूर.
मराठवाडा: जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर.
थंडीमुळे तीन जणांचा मृत्यू
विदर्भात थंडीची तीव्रता वाढली असून उघड्यावर झोपणाऱ्यांना बेघर नागरिकांचा या थंडीच्या माऱ्यामुळं मृत्यू ओढावल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. सदर घटनांविषयी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद, करण्यात आली असून अंतिम अहवाल आल्यावर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.








