मुंबई,दि.21: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (Shiv Sena) एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आधी 40 आमदारांना आपल्या सोबत घेतल्यानंतर लोकसभेच्या 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली. गजानन कीर्तिकर हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता गजानन कीर्तिकर देखील शिंदे गटात सामील होणार का असा प्रश्न विचारला जात आहेत. (Cm Eknath Shinde meet gajanan kirtikar)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गजानन कीर्तिकर यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. शिवसेनेचे उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरीच आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला गेले. सगळ्यांच्या उपस्थित दोघांमध्ये चर्चा झाली. कीर्तिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे.
मात्र ठाकरे गटातील खासदार किर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. केवळ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार, असे म्हणत खासदार गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घरचा आहेर दिला होता. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीमध्ये शिंदे आणि किर्तीकरांमध्ये काही चर्चा झाली असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.