Sameer Wankhede: समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट

0

मुंबई,दि.13: तत्कालीन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी क्रुझ ड्रग्स पार्टीवर कारवाई करत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. पण, आता समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही, असा अहवाल जात पडताळणी समितीने दिला आहे. त्यामुळे वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी मुस्लीम धर्म स्विकारला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळे वानखेडे यांनी आधी राष्ट्रीय जातपडताळणी समितीकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता राज्य जात पडताळणी समितीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला नसून ते हिंदु महार असल्याचा खुलासा केला आहे.

एनसीबी संचालक समीर वानखेडे हे हिंदू महार नाही तर मुस्लीम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. समीर वडील ज्ञानदेव का दाऊद? या उपस्थित केलेला सवाल? जातीचे खोटे पुरावे देऊन समीर वानखेडे केंद्र सरकारच्या सेवेत दाखल झाल्याचा, आरोप मलिक यांनी केला होता.

समीर दाऊद वानखेडे का समीर ज्ञानदेव वानखेडे ? ज्ञानदेव वानखेडे हे दाऊद वानखेडे कसे ? आज सरकारी रेकॉर्डवर, समीर हिंदू महारजन्म झाला. वडील हिंदू का मुसलमान ? समीर यांचा जन्म झाला तेव्हाच्या कागदावर समीर मुसलमान नंतर सरकारी नोकरी कागदावर समीर नवबौद्ध असल्याचा उल्लेख होता. मलिक यांनी याबद्दल वानखेडे यांच्या वडिलांचे कागदपत्र सुद्धा दाखवली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here