IPL 2023 वेळापत्रकात ICC च्या नियमामुळे होणार बदल

IPL 2023: कोणत्याही दोन स्पर्धांमध्ये सात दिवसांचा बफर वेळ असावा, असा आयसीसीचा नियम आहे

0

नवी दिल्ली,दि.26: IPL 2023 वेळापत्रकात ICC च्या नियमामुळे बदल करावा लागणार आहे. आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीग 2023 (IPL 2023) बाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. 23 डिसेंबर म्हणजेच गेल्या शुक्रवारी आयपीएल 2023 ची मिनी ऑक्शन (Mini Auction) घेण्यात आली. त्यामुळे आता IPL 2023 ही स्पर्धा कधी सुरु होणार याची उत्सुकता सर्वांना असेल. पण आता आयपीएलच्या नियोजनावर संक्रात आल्याचे समोर आले आहे. कारण आयसीसीच्या नियमांमुळे आता आयपीएलचे वेळापत्रक बदलण्याची वेळ भारतीय संघावर आली आहे.

ICC च्या नियमामुळे करावा लागणार बदल | IPL 2023 Schedule

पुढील वर्षी IPL हे 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. पण आयपीएल ही स्पर्धा 74 दिवसांची असणार, असे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते. पण आता BCCI आपले आयपीएलचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. कारण ICC च्या एका नियमानुसार दोन मोठ्या स्पर्धांमध्ये 7 दिवसांचा तरी अवधी असायला हवा, असा नियम आहे आणि या नियमाचा फटका आता आयपीएलच्या वेळापत्रकाला बसणार आहे.

जाहिरात

BCCIच्या योजनेवर फेरलं पाणी

यंदाच्या आयपीएलमध्ये 10 टीम्स असल्याने बीसीसीआय 2023 चं आयोजन 74 दिवसांसाठी करू इच्छिते. मात्र त्यांची ही योजना किती प्रमाणात यशस्वी ठरेल, यावर प्रश्नचिन्ह आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2023 चा यंदाचा सिझन 60 दिवसांपर्यंत खेळवला जाऊ शकतो.

असा आहे आयसीसीचा नियम

आयपीएल ही 1 एप्रिल ते 13 जूनपर्यंत रंगेल, असे सर्वांना वाटत होते. पण आयसीसीने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल 7 जूनला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते आपला निर्णय बदलणार नाहीत. कोणत्याही दोन स्पर्धांमध्ये सात दिवसांचा बफर वेळ असावा, असा आयसीसीचा नियम (ICC Rules) आहे. त्यामुळे आता बीसीसीआयला आयपीएल ही 31 मे पर्यंत संपवावी लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलसाठी 14 दिवस कमी पडणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयला आता या 14 दिवसांतील सामने अन्य दिवशी हलवावे लागणार आहे.

बीसीसीआयला IPL 2023 Schedule मध्ये करावा लागणार बदल

त्यामुळे आता बीसीसीआयला IPL Schedule मध्ये आता बदल करावा लागणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय आयपीएलच्या वेळापत्रकात नेमका काय बदल करते आणि 14 दिवसांचे सामने कधी खेळवते, याची उत्सुकता चाहत्यांना असणार आहे. त्यामुळे जेव्हा बीसीसीआय आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करेल, तेव्हाच या सर्व गोष्ट समोर येतील. जर भारतीय संघ आयसीसीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला तर या वेळापत्रकात अजून काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाने ठोस पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे आता भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ असल्याचे समजले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here