मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे त्यांनी दसऱ्यालाच शिमगा केला : चंद्रकांत पाटील

0

 
कोल्हापूर,दि.16: कोल्हापुरात पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर सडकून टीका केली आहे. पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात लावतील असे वाटले होते. महिलांवरील अत्याचार वाडत चालले त्याबद्दल काय करणार सांगतील असे वाटले होते, पण त्यांनी केवळ पुसट उल्लेख केला. महिलांसाठीचा कायदा का पेंडिंग आहे? ते सांगितले नाही.

शेतकऱ्यांचा आक्रोश चालू त्यावर काय करणार आहे, सांगितले नाही. शेतकऱ्यांना दहा हजार कोटी दिल्याची शेखी मिरवता मग त्याची फोड मांडा, कशाला काय दिले, रस्ते दुरुस्त करणे व धरणे दुरुस्त करण्यास दिले तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा
 
तुम्ही शेतकऱ्याला दिले 10,000 रुपये हेक्टरी पण देवेंद्रजींनी 20,400 हेक्टर जिरायतीला दिले, बागायतीसाठी 54000 हेक्टर दिले आणि बहुवर्षीय पिकांसाठी तुम्ही पंचवीस हजार दिले त्याला देवेंद्रजींनी 75000 हेक्टरी दिले.
 
महाराष्ट्रात दोन दोन वादळे, अतिवृष्टी, पूर अशी संकटे आली, महिलांवर अत्याचार झाले, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले या पैकी तुम्हाला कशाचे गांभीर्य नाही.
 
पंढरपूर आणि आता देगलूरला बाहेरून उमेदवार आणला अशी टीका करता तर तुमची उमेदवारांची यादी वाचा अब्दुल सत्तार कोठून आले? भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा उमेदवार म्हणून पळविला. तो पराभूत झाला. तेथे आम्ही ज्याला निवडून आणले त्याला तुम्ही जागावाटपात जागा घेतल्यानंतर आमचा सिटिंग खासदार घेतला. तुम्ही शिवसेनेच्या 30-35 जागांवर भाजपाचे उमेदवार घेतले. गौरव नायकवाडी, कोरेगावचे महेश शिंदे मोठी यादी आहे. जागा सेनेची पण उमेदवार भाजपाचा असे घडले. आम्ही चुकीचे म्हटले नाही. असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
 
स्वातंत्र्य लढ्यात कोठे होता असे विचारता. 1925 संघाची स्थापना झाली. प. पू. हेडगेवार हे क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी त्यांनी काही वर्षे संघ स्थगित ठेवला मी लढ्यात उतरणार तुम्ही उतरा असे स्वयंसेवकांना सांगितले. स्वातंत्र्यानंतर संघाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली.
 
पण आणीबाणीत तुम्ही कोठे होता? इंदिरा गांधी लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला, हजारो पत्रकारांना – लाखो स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले, त्यावेळी तुम्ही इंदिरा गांधींशी तडजोड केली. तुम्ही आज भारत माता की जय ची चेष्टा केली, वंदे मातरमची चेष्टा केली.
 
मुंबईत सैन्याचे कसे चालते कळण्यासाठी संग्रहालय करणार म्हणून सांगितले मग अरबी समुद्र शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे गेल्या दोन वर्षात काय झाले सांगा.
 
आता खूप हिंदुत्व आठवू लागले, पण सहकारी पक्षाला विचारले का हिंदुत्वावर बोलणार आहे. सत्तेवर येताना सहकारी पक्षांनी आक्षेप घेतला म्हणून आघाडीतून शिव शब्द काढला. सत्तेसाठी हिंदुत्व बाजूला ठेवले.
 
वारंवार बाबरी मशिद पाडण्याचे श्रेय घेता, पण एक तरी शिवसैनिक तेथे होता का? स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, कोणी याची जबाबदारी घेणार नसेल तर मी घेईन. पण राम मंदिराच्या उभारणीसाठीची धग मनामनात कोणी निर्माण केली तर संघाने निर्माण केली, संघापासून प्रेरणा घेणाऱ्या विहिंपने केली, हा लढा संघाने जनतेपर्यंत पोहचवला, त्यावेळी सैनिक कोठे होते.

प्रत्यक्ष अयोध्येत तीन वेळा संघर्ष झाला त्यावेळी सैनिक कोठे होते
बाळासाहेब ठाकरे म्हणाले की याची कोणी जबाबदारी घेणार नसेल तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण याच्या आधारावर बाबरी मशिद तुम्हीच पाडली आणि राम मंदिर पण तुम्हीच बांधले म्हणणार का? आज त्यांना अचानक हिंदुत्व आठवायला लागले, राम मंदिर आठवायला लागले काही वेगळा संकेत दिसतो.
 
सार्वभौम राज्य म्हणणे हे धक्कादायक आहे. देशाला सार्वभौमत्व आहे. तुम्ही राज्याला द्यायला लागलात.
 
कोविडमध्ये सर्व काही आपण केले म्हणता. लसी, मास्क, पीपीई कीट, व्हेंटिलेटर सर्व काही केंद्राने दिले तुम्ही काय केले तुम्ही पॅकेजपण दिले नाही, कोविडमध्ये तुम्ही काही केले नाही, सर्व केंद्राने केले, तरीही केंद्रावर आरोप करायचे चालू आहे. आजच शिमगा चालू.
 
शब्द पाळला नाही म्हणाले, जर एवढी विचारांची चाड असती जर भाजपाने दगा दिला वाटते तर तुम्ही कोणा बरोबरच गेला नसता आणि पुन्हा निवडणुकीची वेळ आणली असती.
 
शेतकऱ्यांच्या समस्या, साखरधंदा अडचणीत, सोयाबीनचे भाव पडले, कर्जमाफी, प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्यांना मदत या कशावरही बोलले नाहीत.
 
शिवसेनेने हिंदुत्वासाठी कधी लढे दिले, राम मंदिरासाठी काय केले,
बाळासाहेबांनी एक वाक्य म्हटले त्यावर किती दिवस बोलणार.
 
त्यांनी केंद्रावर टीका करताना दुजाभाव केल्याचा आरोप केला. पण 2,70,000 कोटी रुपयांचे प्रत्येकी पाच किलो रेशन देशभर मोदींनी पाठवले, त्यात महाराष्ट्रात कोठे दुजाभाव केला का, पीपीई किट, एन 95, व्हॅक्सिन सर्वांत जास्त महाराष्ट्राला दिले, महाराष्ट्रात व्हॅक्सिनचे उत्पादन केले का?
 
सेना भाजपा जवळ येण्याचा विषयच नाही, भाजपा राष्ट्रवादी सोबत येण्याचा विषय नाही, आम्हाला सत्तेवर जाण्याची घाई नाही, आम्ही आमच्या टर्मवर चालणारे आहोत, भाजपा प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
रोहित पवारांनी भगवा झेंडा उभा केला
आज उद्धवजींनी हिंदुत्वावर पूर्ण भाषण केले संभ्रमच आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
 सर्व भाषणात केवळ केंद्र आणि भाजपाला टार्गेट केले
केंद्राने जे दिले त्याचा उल्लेख केला असता तर बॅलन्स झाला असता, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here