Chandrakant Patil: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट, सर्व पुरावे तयार 7 मार्चनंतर उलगडा होणार

0

कोल्हापूर,दि. 22: Chandrakant Patil: शिवसेना (Shivsena) भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अनेक गंभीर आरोप करत गौप्यस्फोट करत आहेत. तर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हेही अनेक गौप्यस्फोट करत आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian death case) काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अत्यंत खळबजनक आरोप केले होते. त्यातच आज सकाळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही दिशा सालियन मृत्यू प्रकरणी ट्विट केलं. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक मोठा गौप्टस्फोट केला आहे.

दिशा सालियन प्रकरणाचा 7 मार्चनंतर उलगडा

सर्व पुरावे तयार आहेत. सात मार्च नंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होईल. कोणाकोणाचा सहभाग आहे हे लवकरच स्पष्ट होईल असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

इतकंच नाही तर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठीच सर्व फडफड आणि शिवराळ भाषा सुरू असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here