Chandipura Virus: चांदीपुरा व्हायरसचा कहर, आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू

0

मुंबई,दि.26: Chandipura Virus: गुजरातमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून चांदीपुरा विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासनाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसमुळे आतापर्यंत 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये आतापर्यंत चांदीपुरा विषाणूचे 124 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सध्या चंडीपुरा विषाणूची लागण झालेले 54 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत तर 26 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सुरुवातीला ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या जास्त होती. त्यानंतर आता अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत या महानगरांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत.

आतापर्यंत नोंद झालेल्या चांदीपुरा विषाणूच्या 124 प्रकरणांपैकी साबरकांठामध्ये 12, अरावलीमध्ये 6, महिसागरमध्ये 2, खेडामध्ये 6, मेहसानामध्ये 7, राजकोटमध्ये 5, सुरेंद्रनगरमध्ये 4, अहमदाबाद कॉर्पोरेशनमध्ये 12, गांधीनगर, पंचमहालमध्ये 6 प्रकरणे आहेत. जामनगरमध्ये 15, मोरबीमध्ये 6, गांधीनगर कॉर्पोरेशनमध्ये 3, छोटा उदेपूरमध्ये 2, दाहोदमध्ये 6, वडोदरामध्ये 2, बनासकांठामध्ये 5, वडोदरा कॉर्पोरेशनमध्ये 2, भावनगरमध्ये 1, देवभूमी द्वारकामध्ये 4 राजकोट कॉर्पोरेशनमध्ये 3, कच्छमध्ये 3, सुरत कॉर्पोरेशनमध्ये 2, भरूचमध्ये 3, अहमदाबादमध्ये 1 आणि जामनगर कॉर्पोरेशनमध्ये 1 रुग्ण आढळले आहेत.

गुजरातशिवाय राजस्थानमध्येही चांदीपुरा व्हायरसची काही प्रकरणे समोर आली आहेत. राजस्थानमध्ये आतापर्यंत 6 प्रकरणे समोर आली आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जणांवर उपचार सुरू आहेत. त्याच वेळी, मध्य प्रदेशात 2 आणि महाराष्ट्रात 1 रुग्ण आढळला आहे.

चांदीपुरा व्हायरस | Chandipura Virus

1966 मध्ये महाराष्ट्रात या व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळल्याचे मानले जाते. नागपूरमधील चांदीपूर भागात पहिला संशयित रुग्ण आढळल्याने याचे नाव चांदीपुरा व्हायरस पडले. यानंतर 2004, 2006 आणि 2019मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा व्हायरस आढळला होता. हा एक आरएनए व्हायरस असून मादी फ्लेबोटोमाइन माशीमुळे पसरतो.

काय आहेत लक्षणे?

चांदीपुरा व्हायरसची लक्षणे खूप काही वेगळी नाहीत. मात्र रुग्णाला सतत ताप येतो. ताप आणि एन्सेफलायटीसची लक्षणे रुग्णात दिसतात. एन्सेफलायटीस हा एक गंभीर आजार असून ज्यामुळे मेंदूला सूज येते. चांदीपुरा व्हायरसवर कोणतीही लक्ष उपलब्ध नाही. त्यामुळे हा आजार वेळीच लक्षात येणे आवश्यक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here