मुंबई,दि.2: हवामान विभागाने महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडी वाढली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता हवामान बदलामुळे राज्यावर पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसात लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटलं आहे. या परिस्थितीत आजचं तापमान कसं असेल ते जाणून घ्या.
अवकाळी पावसाची
पहाटे आणि रात्री राज्यातील अनेक भागात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे, तर दिवसा तापमानात वाढ झाल्याचंही दिसून येत आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानातील बदलामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.