Buldhana Crime: उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक

Buldhana News: उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना अटक

0

बुलढाणा,दि.29: Buldhana Crime: उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे (Bhikaji Ghuge) यांच्यासह तिघांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. घुगे यांना एक लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुलढाण्यात (Buldhana) मोठी कारवाई केली. याप्रकरणी एका क्लार्क आणि वकिलाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पद आणि लाचेची रक्कम बघता 2022 मधील बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे.

हेही वाचा Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काँग्रेस नेते राहुल गांधींचं भावनिक ट्विट

उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे ACB च्या जाळ्यात | Buldhana Crime

जिगाव प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यम प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (Deputy District Magistrate) भिकाजी घुगे (Bhikaji Ghuge) आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी लाच मागितली होती. याचा पहिला हफ्ता स्वीकारताना एसीबी त्यांना अटक केली. काल (28 डिसेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास केलेली ही कारवाई मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. लिपीक नागोराव खरात यालाही ताब्यात घेण्यात आले असून धक्कादायक बाब म्हणजे मोताळा येथील वकील अनंत देशमुख यांच्यामार्फत ही लाच स्वीकारण्यात आली.

Buldhana Crime
उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे

चूक प्रशासनाची भुर्दंड शेतकऱ्याला | Buldhana News

नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्याची जिगाव प्रकल्पात जमीन गेली होती. त्यात वडिलांच्या नावाऐवजी काकाचे नाव यादीत आल्याने ते नाव बदलून घेण्यासाठी तो कार्यालयात आला होता. परंतु या प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मिळणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम लाच उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी मागितली होती. शेतकऱ्याला मिळणारी संपूर्ण रक्कम 21 लाख होती त्याची 10 टक्के रक्कम म्हणजे 2 लाख 17 हजार रुपयांची लाच घुगे यांनी मागितली होती. त्याचा एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्वीकारताना भूसंपादन उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यात त्यांचा लिपिक नागेश खरात आणि वकील अनंत देशमुख अशा तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

जाहिरात

अशी करण्यात आली कारवाई

तक्रारकर्त्याच्या वडिलांचे नांव ‘रविंद्र’ होते आणि चुलत्याचे ‘राजेंद्र’.. रविंद्रच्या ऐवजी राजेंद्र झाल्यामुळे रक्कम तक्रारकर्त्याला मिळत नव्हती. जी चूक भूसंपादन विभागाने केली, त्याच्याच दुरुस्तीचे तक्रारदार शेतकर्‍याकडून एक लाख रुपये लाचेच्या स्वरुपात उपजिल्हाधिकारी घुगे यांनी मागितल्याची तक्रार करण्यात आली आहे. लिपीकामार्फत ही रक्कम वकील अनंत देशमुख यांना देण्याचे ठरले.

तक्रारदाराने इकडे भ्रष्टाचार विरोधी प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सायंकाळी 4.30 च्या सुमारास एक लाख रुपये घेवून तक्रारदार शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात पोहोचला. वकील अनंत देशमुख आणि लिपीक नागोराव खरात यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपीक खरात आणि वकील देशमुख या तिघांनाही पकडले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here