राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी दिली प्रतिक्रिया

0

दि.२०: भाजपा खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली होती. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनीच ट्विटरवरुन दिलीय. राज यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय. दरम्यान राज यांचा हा दौरा स्थगित झाल्यानंतर त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा तीव्र विरोध होता. उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या अशी ब्रिजभूषण सिंग यांची अट आहे. मात्र आता प्रकृतीसंदर्भातील कारणामुळे तुर्तास राज यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय. याबाबत २२ ला पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे भाष्य करतील भूमिका मांडतील असे संकेत राज यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दिलेत.

बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

“आम्ही पाच जून रोजी अयोध्येमध्ये शरयू नदीत स्नान करणार आहोत. तेथील साधू-संतांसोबत आम्ही पूजा-पाठही करणार आहोत,” असं बृजभूषण यांनी सांगितलं आहे. “राज ठाकरेंनी त्यांचा दौरा स्थगित केला असला तरी आम्ही तिथे नक्की जाणार आहोत. आम्ही योगी आदित्यनाथांचा वाढदिवसही तिथे साजरा करणार आहोत,” असं बृजभूषण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. फेसबुकवरुनही त्यांनी यासंदर्भातील एक पोस्ट केलीय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here