अमरावती,दि.14: सर्वत्र वटपौर्णिमेचा (Vat Purnima) सण साजरा होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पतीच्या निधनानंतर वैधव्य आलेल्या महिलांसोबत वटपौर्णिमेची पूजा केली. दरम्यान, यावेळी त्यांनी घेतलेल्या एका विशेष उखाण्यानं सर्वांचच लक्ष वेधलं आहे.
सुप्रिया सुळेंच्या या अनोख्या वटपौर्णिमेची (Vat Purnima) सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यानिमित्ताने त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवल्याचंही बोललं जात आहे. विधवांना कुठल्याही सण-समारंभात स्थान दिले जात नाही. याच परंपरेला फाटा देत सुप्रिया सुळे यांनी आज अमरावतीत विधवा महिलांसोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा पाडला.
यादरम्यान, त्यांनी घेतलेला उखाणा हा सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा ठरला. महिलांच्या आग्रहास्तवर सुप्रिया सुळे यांनी उखाणा घेतला. “ग्लासात ग्लास 36 ग्लास, सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास,” असा उखाणा त्यांनी घेतला. यानंतर उपस्थित महिलांनीही त्यांचं कौतुक केलं.
Home  महाराष्ट्र  Vat Purnima: परंपरेला फाटा देत सुप्रिया सुळे यांचे अमरावतीत विधवा महिलांसोबत वटपौर्णिमेचे...
 
            
