Breaking: नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघातात जयनगर एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरुन घसरले

0

नाशिक,दि.3: Breaking: Train Accident: नाशिकजवळ एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे 19 पैकी 12 डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली आहे. देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या वतीने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.15 च्या सुमारास लहवित आणि देवलाली (नाशिकजवळ) दरम्यान 11061 एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जीवित व वित्तहानीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र वैद्यकीय पथक आणि संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. देवलालीजवळ एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले असल्याची प्रथमिक माहिती आहे. या रेल्वे अपघातात प्राथमिक माहितीनुसार 3-4 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे अपघात मदत व्हॅनही घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने यासंबंधित अपडेट जारी करत म्हटले आहे की, भुसावळ विभागातील नाशिकजवळ 11061 LTT-जयनगर एक्स्प्रेसचे 11 डबे आज पहाटे 3.10 वाजता नाशिकजवळील लहवित आणि देवळाली दरम्यान रुळावरून घसरले. भुसावळहून अपघात निवारण वैद्यकीय उपकरणे आणि इगतपुरीहून वैद्यकीय व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघातात आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

हेल्पलाइन क्रमांक

सीएसएमटी- 022-22694040
सीएसएमटी- 022-67455993
नाशिकरोड – 0253-2465816
भुसावळ – 02582-220167
54173 आपत्ती व्यवस्थापन कक्ष

रेल्वे अपघातामुळे पंचवटी आणि नंदीग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 12109 आणि 12110 ही पंचवटी एक्सप्रेस आहे. तर 11401 ही नंदीग्राम एक्सप्रेस आहे. तर 22221 ही राजधानी एक्सप्रेस, 12261 हा हावडा दुरोंतो आणि 12173 ही उद्योग नगरी एक्सप्रेस दुसऱ्या मार्गाने चालवण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here