भारतात कोविड लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार?

0

Covid Vaccine Booster Shot: परिणाम जाणून घेण्यासाठी सरकार 3,000 लोकांचा अभ्यास करणार

सोलापूर,दि.24: Covid Vaccine Booster Shot: ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) अनेक देशात कहर केला आहे. भारतातही (India) ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आणि कोविडच्या तिसर्‍या लाटेच्या (Corona Third Wave) भीतीने देशात कोविड लसीच्या बूस्टर डोसबाबत (Covid Vaccine Booster Shot) अटकळ सुरू झाली आहे. असे अनेक देश आहेत जे आपल्या नागरिकांना आता बूस्टर डोस घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. बूस्टर डोस कोविड विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या लसीच्या तिसरा डोसला म्हटले जात आहे. भारतातील बूस्टर डोसबाबत सरकारची रणनीती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र लवकरच सरकारची भूमिका स्पष्ट होईल. वास्तविक, केंद्र सरकार कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत (Covid Vaccine Booster Shot) लवकरच अभ्यास सुरू करत आहे. सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासात कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 3000 लोकांना बूस्टर डोस देऊन परिणामांचा अभ्यास केला जाईल. हा अभ्यास THSTI (Translational Health Science and Technology Institute) येथे होणार आहे. THSTI बायोटेक विभागांतर्गत येते.

हेही वाचा Immunity Booster Foods: या वस्तू वाढवतील नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती

अलीकडील काही संशोधनात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की कोविशिल्ड, भारतात दिली जात असलेली कोरोना लस, दोन्ही डोस घेतल्यानंतर तीन महिन्यांनी त्याचा परिणाम कमी होतो. यामुळे निर्माण होणारा प्रतिकारशक्ती या मध्यांतरानंतर कमी होते. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाच्या कोविड-19 लसीच्या दोन्ही डोसद्वारे उत्पादित संरक्षण दोन-तीन महिन्यांनंतर कमी होते.

ब्राझील आणि स्कॉटलंडमधील डेटावरून काढलेल्या निष्कर्षांमध्ये असे आढळून आले की ज्या लोकांना AstraZeneca लस मिळाली आहे त्यांना गंभीर आजारापासून संरक्षण करण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता आहे. AstraZeneca लस भारतात Covishield म्हणून ओळखली जाते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here