भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतले ताब्यात

0

दि.२० : भाजपा नेते किरीट सोमय्या हे काल रात्री कोल्हापूरला रवाना झाले होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) आज कोल्हापुरात जाण्यास निघाले होते. मात्र, आज पहाटे साडेचारच्या सुमारास कराड पोलिसांनी किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतलं आहे. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सोमय्यांना विनंती केल्यानंतर ते कराड येथे उतरले आहेत.

किरीट सोमय्या काल संध्याकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबई सीएसएमटीहून कोल्हापूरला रवाना झाल्यासाठी निघाले होते. मुंबईतही सोमय्या यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसनं कोल्हापूरला जाण्यासाठी रवाना झाले होते. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी विनंती केल्यानंतर सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड येथे उतरले आहेत. सोमय्यांना सध्या कराडच्या सर्किट हाउसवर ठेवण्यात आलं आहे. तसंच, तिथेच सकाळी नऊच्या दरम्यान सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत.

माझे भांडण प्रशासनाशी नाही, त्यामुळे प्रशासन अडचणीत येत असेल तर मी येणार नाही, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. तसंच, पुढील दोन दिवसांनी कोल्हापूरला येणार असल्याची माहितीही त्यांनी दिला आहे. सोमय्यांच्या या निर्णयामुळं कोल्हापुरात होणारा संघर्ष तात्पुरता टळला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here