सोलापूर,दि.४: Mumbai Hyderabad Bullet Train: मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad bullet train) मार्गाच्या पूर्णत्वासाठी केंद्राकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. एकीकडे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे तर दुसरीकडे मात्र, सोलापुरातून पुढे जाणाऱ्या मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन (Mumbai Hyderabad Bullet Train) मार्गाला केंद्राने ‘रेड सिग्नल’ दिला आहे. देशात दुसऱ्यांदा सत्ता मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा केली.
पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आवश्यक असणारी सत्ता सर्व प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद या मार्गासाठी सद्यःस्थितीत भूसंपादनाचे कामही युध्दपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. शिवाय त्याबाबतच्या शासन स्तरावरून कोणत्याच हालचाली नाहीत.
हेही वाचा मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन: सोलापूर जिल्ह्यातून जाणार्या बुलेट ट्रेनबाबत तर्क-विर्तकांना उधाण
सध्या तरी मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गाला केंद्र सरकारकडून रेड सिग्नलच दिसत आहे. मुंबई-हैदराबाद मार्गासाठी जमिनींचे लागणाऱ्या अद्यापही भूसंपादन करण्याची कसलीही प्रक्रिया प्रशासन स्तरावर नाही. शिवाय ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन त्याबाबतच्या लिमिटेड’कडूनही कोणत्याही सूचना प्रशासनाला प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे आणखी वर्षभर तरी या मार्गाच्या कसलीही भूसंपादनासाठीची प्रक्रिया सुरू होणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
साडेसहाशे किलोमीटरचा मार्ग
‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ला रेल्वे मंत्रालयाने सात हायस्पीड रेल कॉरिडोरसाठी डीपीआर तयार करण्याचे अधिकार दिले. त्यानुसार सोलापूर – हैदराबाद या बुलेट ट्रेन मार्गासाठी सामाजिक सर्व्हेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई – हैदराबाद हा मार्ग सुमारे ६४९.७६ किलोमीटरचा आहे. हा उच्च प्राधान्य असलेल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे. या मार्गासाठी राज्यातील ठाणे, रायगड, पुणे आणि सोलापूर या चार जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील कलबुरगी, तेलंगणा राज्यातील विकाराबाद, रंगारेड्डी, संगारेड्डीमधून हा मार्ग जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातून १७० किमीचा कॉरिडोर
मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेनच्या लोहमार्गासाठी जिल्ह्यातील ३१७.९ ७५ हेक्टर भूसंपादनाची गरज
२ हजार ४७५ शेतकऱ्यांना द्यावी लागणार जमीन
जिल्ह्यातून एकूण १६९ .८१ किलोमीटर असणार मार्ग
सोलापूर आणि पंढरपूर येथे असणार बुलेट ट्रेनचे स्टेशन