बड्या नेत्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा दावा

0

मुंबई,दि.11: बड्या नेत्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. भाजपाने अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि चव्हाण खासदार झाले. विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाण यांचे राईट हँन्ड असून ते लवकरच भाजपात येणार असल्याचा दावा विदर्भातील एका बड्या नेत्याने केला आहे.

काँग्रेस पक्षातही अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे चित्र आहे. यातच आता विजय वडेट्टीवार लवकरच भाजपामध्ये जाणार आहेत. ते अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत, असे वक्तव्य धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. ते अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या गटातील तसेच नजीकचे मानले जाणारे अनेक नेते भाजपामध्ये गेले आहेत. ही एक प्रकारची सूचक दिशा आहे की, विजय वडेट्टीवार हे भाजपामध्ये जाणार आणि ही गोष्ट १०० टक्के खरी आहे, असा मोठा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. 

विजय वडेट्टीवार भाजपामध्ये जाण्यासंदर्भात ज्या काही बैठका, चर्चा झाल्या, त्यात मीही सहभागी होतो. त्यामुळे आज नाही तर उद्या विजय वडेट्टीवार भाजपामध्ये नक्की जाणार, असे आत्राम यांनी म्हटले आहे. या बैठकांबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही. मात्र, तेही होते आणि मीही होतो, एवढेच सांगेन. या सगळ्या चर्चा माझ्यासमोर झाल्या. अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यानंतर विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये राहून काय करणार, तेही भाजपामध्ये जाणार, असे आत्राम यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here