शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

0

मुंबई,दि.5: Maharashtra News: शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. 10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इतर महत्त्वाचे निर्णय
शेतक-यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित
ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद
नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार
देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल
सेलर इन्स्टीट्यूट “सागर” भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण
अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील 14 पदे निर्माण करणार
महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी
अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here