सोलापूर,दि.५: अॅानलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल वर पी. एम. किसान यादी किंवा पी. एम. किसान ॲप या मॅसेजची लिंक अघडताच शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे.
शेतकऱ्यांनी फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन सावध रहा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी मोबाईलवर पी. एम. किसान लिस्ट, ॲप किंवा पी. एम. किसान ॲप या संदेशाची लिंक उघडू नये किंवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये, तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भोसले यांनी केले आहे.