राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं

0

मुंबई,दि.4: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. पण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणारे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचना केली आहे.

अब्दुल सत्तार यांनी वापरले अपशब्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोडमध्ये होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद आणि सिल्लोड दौऱ्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अपशब्द वापरले होते.

राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांची केली होती तक्रार

या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. अखेर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंच्या बाबतीत केलेल्या विधानाची राज्यपालांनी दखल घेतली आहे. राज्यपालांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. सत्तार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं पत्रात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिलांकडून राज्यपालांकडे सत्तार यांची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल राज्यपालांनी घेतली.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

‘महाराष्ट्रामध्ये कोणतीही खळबळ उडाली नाही. मी माझ्याा बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोके घेतले म्हणून बदनाम करत आहे, ते XXXचोट आहे. ते मग कुणीही असेल. खोके घेतले अशा शब्दांत जर कुणी टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. मी जे बोलतोय खरं आहे. तुम्ही एका व्यक्तीचे नाव कशाला घेता. मी सर्वांसाठी बोललो. आता सर्वांसाठी बोललो. तुम्ही एका महिलाबद्दल बोलताय, असं न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीने सांगितलं, तरीही सत्तार म्हणाले की, मी सर्वांसाठी बोललोय. अजून कुणीही बोलेल, ते ज्या भाषेत बोलले, त्याला उत्तर देईन.’ असं सत्तार म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here