बीसीसीआय लवकरच आयपीएलसारखी नवी लीग सुरु करण्याच्या तयारीत

0

मुंबई,दि.15: बीसीसीआय लवकरच आयपीएलसारखी नवी लीग सुरु करण्याच्या तयारीत आहे. या नव्या क्रिकेट लीगची कल्पना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची असल्याचं बोललं जात आहे. आयपीएलच्या धर्तीवर भारतात लवकरच नव्या क्रिकेट लीगची घोषणा होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही क्रिकेट लीग खेळवली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या कल्पनेतून ही नवी लीग सुरु होणार आहे. पण त्याआध बीसीसीआयसमोर (BCCI) काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर सोडवल्यानंतर या लीगची घोषणा केली जाईल. 2008 मध्ये आयपीएल टी20 स्पर्धेला सुरवात झाली. 2024 मधला आयीएलचा (IPL) सतरावा हंगाम असणार आहे. आयपीएलच्या नव्या हंगामाबरोबरच नव्या क्रिकेट लीगची सुरुवात करण्याची योजना बीसीसीआयने बनवली आहे. सर्व योजनेप्रमाणे झाल्यास तर 2024 मध्ये नव्या फ्रँचायजीसह ही लीग सुरु होण्याची शक्यता आहे.

नवी क्रिकेट लीग


मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार भारतीय क्रिकेट बोर्डमध्ये नव्या क्रिकेट लीग संदर्भात चर्चा सुरु आहे. ही क्रिकेट लीग T10 फॉर्मेटमध्ये (T10 Format) असेल. ही लीग आयपीएल सारखी सीनिअर लेव्हलची नसेल तर खेळा़डूंची एक वयोमर्यादी निश्चित केली जाईल असं बोललं जातंय. तसं T10 हा प्रकार क्रिकेटमध्ये नवा नाही. गेल्या काही काळात T10 सामन्यांनाही क्रिकेट चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अबूधाबी टी10 क्रिकेट लीगला खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतात T10 सारखी कोणतीही मोठी क्रिकेट लीग नाहीए. त्यामुळे बीसीसीआय अशी लीग सुरु करण्यासाठी उत्सुक आहे. या लीगचा फॉर्मेट कसा असेल यावर सध्या विचार सुरु आहे.

कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?


टी10 क्रिकेट लीगमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार यााबबतही विचारविनियम सुरु आहे. आयपीएलला स्पर्धा होईल अशी लीग बीसीसीआय सुरु करणार नाही. त्यामुळे टी10 क्रिकेट लीगमध्ये मोठ्या खेळाडूंचा समावेश नसेल. या स्पर्धेत प्रतम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या म्हणजे ज्युनिअर खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

टी10 स्पर्धेसाठी विंडो


टी10 स्पर्धेसाठी नव्या फ्रँचाईजी असतील का याबातही विचार सुरु आहे. आयपीएलमधल्याच फ्रँचाईजीचा या समावेश केला जाऊ शकतो का, कारण आयपीएलमधल्या सध्याच्या फ्रँचाईजीचा बीसीसीआबरोबर करार आहे. यात आयपीएलसारख्या कोणत्याही लीगची सुरुवात केल्यास विद्यमान फ्रँचाईजला पहिली ऑफर द्यावी लागेल असं लिहिण्यात आलं आहे. टी10 क्रिकेट लीगसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विंडो खुली होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here