Barshi News: बार्शी पांगरी स्फोट प्रकरण, मालक युसुफ मणियार यांना अटक

Barshi News: भागीदार नाना पाटेकर फरार

0

सोलापूर,दि.3: Barshi News: बार्शी पांगरी स्फोट प्रकरणी मालक युसुफ मणियार यांना पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली होती. (Solapur Barshi Pangri Fire News) जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला होता. (Solapur Barshi Pangri News)

कारखान्यातील स्फोटात 4 जणांचा मृत्यू | Barshi News

पांगरी येथे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या फटाके कारखान्यातील स्फोट व चार महिला कामगारांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारखाना मालक व भागीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. फरार असलेल्या दोघांपैकी कारखाना मालकास मंगळवारी सकाळी शिराळे शिवारातील ज्वारीच्या पिकातून पांगरी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आरोपीच्या अटकेसाठी मंगळवारी पांगरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये मुख्य बाजारपेठसह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

भागीदार फरार | Barshi Pangri News

युसुफ हाजी मणियार (रा.पांगरी ता.बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या कारखाना मालकाचे नाव असून भागीदार नाना पाटेकर (रा.उस्मानाबाद) हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कामगीरी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलिस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस पथकाचे प्रमुख सपोनी नागनाथ खुने, सहाय्यक फौजदार सतिश कोठावळे, सुनील बोदमवाद, अर्जुन कापसे, संतोष कोळी यांच्या पथकाने केली.

एक पथक पुणे, मुंबई, ठाणे आदी भागात रवाना केले होते. तर दुसरे पथक हुबळी, सोलापूर, विजयपूर आदी भागात पाठवले होते. तर पांगरी पोलीस ठाण्याचे सपोनी नागनाथ खुने यांचे पथक उस्मानाबाद, केज, बिड, धारूर, कळंब आदी भागात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना आरोपी मणियार हा शिराळे हद्दीतील सुतार शेतातील ज्वारी पिकांमधून अटक केली.

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार 1 जानेवारी 2023 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here