100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, राणे समर्थकांची मुंबईत बॅनरबाजी

0

मुंबई,दि.29: संतोष परब हल्लाप्रकरणानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आता मुंबईतही उमटायला सुरुवात झाली आहे. एकीकडे कणकवली पोलिसांनी सिंधुदुर्गातील राणे समर्थकांची धरपकड सुरु केली आहे. त्याचवेळी मुंबईत राणे समर्थकांचे बॅनर्स झळकले आहेत. मात्र, पोलिसांनी तात्काळ ते बॅनर खाली उतरवले आहेत. 

मुंबईच्या दादर परिसरात संकेत बावकर या राणे समर्थकाकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. 100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाही. वाघ हा वाघच असतो, असा मजकूर या बॅनर्सवर लिहला आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही राणे समर्थक असे बॅनर्स लावू शकतात. त्यामुळे मुंबईतही आता शिवसेना विरुद्ध राणे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून म्याव म्याव केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. विधीमंडळातील सभागृहात याचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं. त्यानंतर, आता सभागृहाबाहेरही शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये सामना रंगल्याचं दिसून येत आहे. त्यातच, संतोष परब हल्लाप्रकरणातून चांगलाच वाद रंगला आहे. 

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात सध्या नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्याचवेळी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पाठवून खळबळ उडवून दिली आहे. याशिवाय, नितेश राणे यांचे स्वीय सहायक राकेश परब आणि वेंगुर्ला तालुका प्रमुख मनीष दळवी यांनाही पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहे. या सगळ्यांकडे नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याविषयी माहिती असू शकते. त्यामुळे पोलिसांकडून या तिघांची चौकशी होऊ शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here