मोहोळ,दि.१६: Balraje Patil: लोकनेते साखर कारखान्याच्या वतीने ज्येष्ठ सभासदांचे सामाजिक हित जोपासत सालाबाद प्रमाणे यावर्षी ही कारखान्याच्या वतीने ज्येष्ठ सभासदांना मोफत काशी यात्रेचे आयोजन केले असून शनिवारी सुमारे १०० सभासदांना काशी यात्रा दर्शनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती चेअरमन बाळराजे पाटील (Balraje Patil) यांनी दिली.
लोकनेते साखर कारखान्याचे संस्थापक माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते साखर कारखान्यामार्फत वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर यावर्षी साखर कारखान्याच्या १०० ज्येष्ठ सभासदांना कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील (Balraje Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्यामार्फत मोफत काशी यात्रा दर्शनाकरिता पाठविण्यात आले आहे.
लोकनेते साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मोफत आजमेर दर्गा व काशी विश्वेश्वर यात्रा तसेच मातोश्री लक्ष्मीबाई पाटील शुभमंगल भेट योजना, शेतकऱ्यासाठी ठिंबक सिंचन योजना आदिंसह अनेक सामाजिक योजना राबविण्यात आले आहेत.
याचाच एक भाग म्हणून लोकनेते बाबुराव पाटील कारखान्याच्या वतीने याहीवर्षी कारखान्याच्या ज्येष्ठ सभासदांना काशी विश्वेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले. शनिवारी कारखाना कार्यस्थळावरून १०० सभासदांना काशी विश्वेश्वर यात्रेसाठी रवाना करण्यात आले असून यामध्ये ८० महिला सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जोगदे, मुख्य शेती अधिकारी एम.आय.देशमुख, परचेस अधिकारी मोहन चव्हाण, नेताजी बोडके, गटप्रमुख विष्णू पाचपुंड, झुंबरलाल शिंदे, महादेव गायकवाड, नागेश राऊत, सुधीर मांदे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.