बालासोर,दि.3: Balasore Train Accident: ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasore) येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 238 लोकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम संयुक्तपणे बचावकार्य करत आहे.
अपघाताबाबत मोठी माहिती | Balasore Train Accident
शुक्रवारी (2 मे) सायंकाळी हा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. मात्र, आता ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी या अपघाताबाबत मोठी माहिती दिली आहे. या अपघातात एकूण 3 गाड्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोमंडल एक्सप्रेसच्या 7 बोगींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणथी वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (Odisha Train Accident)
राज्याच्या मुख्य सचिवांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितलं की, आधी हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांवर आदळली आणि नंतर कोरोमंडल एक्स्प्रेस मागून आली, त्यामुळे भीषण अपघात झाला. आतापर्यंत 10 प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.
दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं की, लोकांना नेण्यासाठी सुमारे 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे.
अपघाताबाबात रेल्वे प्रशासनाचं निवेदन
रेल्वेनं एका निवेदनात म्हटलं आहे की, ट्रेन क्रमांक 12841 चेन्नई सेंट्रलहून शालीमारला जात होती. 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ही गाडी शालिमारकडे रवाना झाली होती. खरगपूर विभागांतर्गत बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रात्री 8.30 वाजता रेल्वे रुळावरुन घसरली. अप आणि डाऊन दोन्ही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
नेमका अपघात कसा झाला? | Odisha Train Accident
बहनागा स्टेशनजवळ SMVB-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. प्रथम हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडलला धडकली.
हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र काही क्षणांतच या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी मालगाडी धडकली, आणि मग मृत्यूचं तांडवच सुरू झालं. यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनच्या चालकाला जवळच घडलेल्या अपघाताबाबत माहित नसावं. म्हणून त्याची ट्रेन पूर्ण वेगात होती. आणि हीच ट्रेन घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली.