फळविक्रेत्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी एकास जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.६: फळविक्रेत्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी एकास जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, फिर्यादी हा फळांचा व्यापार करत होता व त्याचे फळे ठेवण्याकरिता स्वता:च्या मालकीचे एक गोडावून आहे. दि. २४/०५/२०२३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पिकअप भरुन विक्री करता आंबे आले असल्याने फिर्यादी व त्याचे वडिल असे दोघे मिळून गोडावून येथे जावून सदर पिकअप खाली करुन घेत होते.

त्यानंतर मालाची छाटणी करीत असताना तेथे फिर्यादीच्या ओळखीचे व नेहमी त्यांच्या गोडावूनला येणारे चेतन चौधरी व इतर आरोपी हे फिर्यादीच्या गोडावूनला आले व त्यातील एकाने फिर्यादीस ५०० रुपयांची मागणी केली परंतु फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे सदर आरोपीने फिर्यादीस दमदाटी केली व सदर आरोपी तेथून निघून गेले. तदनंतर काही वेळाने आरोपी चेतन चौधरी व इतर लोक रॉड, काठया, जांब्या अशा हत्यारांसोबत आले व त्यांनी फिर्यादी व त्याच्या वडिलांवरती खूनी हल्ला चढविला व फिर्यादीस गंभीर जखमी केले.

अशा आशयाची फिर्याद सदर बझार पोलीस ठाणे येथे दाखल झाली. त्याप्रकरणी आरोपी चेतन चौधरी यास दि. २२/०६/२०२३ रोजी अटक करण्यात आली. सदर कामी जामीन मिळण्यापोटी सदर आरोपीने अॅड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला. यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर फिर्यादीस त्याने कथन केलेल्या घटनेप्रमाणे त्याच्या मानेवरती कुठल्याच जखमा आढळून येत नाहीत, त्यामुळे सदर आरोपी चेतन याने खरच सदर फिर्यादीवर रॉडने खुनी हल्ला केला याबद्दल शंका उपस्थित केली जावू शकते. तसेच सदर आरोपीने वापरलेल्या तथाकथित रॉडवरती कुठलेही रक्ताचे थेंब आढळून आलेले नाहीत. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी चेतन चौधरी याची जामीनावर मुक्तता केली. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. फैयाज शेख यांनी काम पाहिले. अॅड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here