३० हजारांची लाच प्रकरण अधिकारी बसवेश्वर स्वामीस जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१४: मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांच्या विकासाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ३० हजारांची लाच प्रकरणातील जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे कार्यालयीन अधीक्षक बसवेश्वर महादेव स्वामी (वय ४५) यांना जामिन मंजूर करण्यात आला आहे.

मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांच्या विकासाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ३० हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे कार्यालयीन अधीक्षक बसवेश्वर महादेव स्वामी (वय ४५) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) सोमवारी (दि.९) जेरबंद केले होते.

पशुसंवर्धन विभागाचे सहायक प्रशासनाधिकारी स्वामी यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. हिंगणी निपाणी येथील सरपंचांनी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या शासनाच्या योजनेंतर्गत विविध विकासकामांच्या मंजुरीकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर केला होता. त्यास अनुसरुन हिंगणी निपाणी गावातील विकासकामांचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे सादर केला होता.

हा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडून मंजूर होण्यासाठी तक्रारदार हे सरपंचांच्यावतीने पाठपुरावा करीत होते. त्यासाठी स्वामी यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सोमवारी समाजकल्याण सभापतींच्या कक्षामधील ॲन्टी चेंबरमध्ये ही रक्कम स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले होते.

लाचेच्या प्रकरणातील आरोपी बसवेश्वर स्वामी सहाय्यक प्रशासन अधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद याची मे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. निलेश जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. राणी गाजुल
फिर्यादी तर्फे ॲड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here