Sanjay Raut: बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे: संजय राऊत

0

मुंबई,दि.१६: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. पत्रकारपरिषदेनंतर पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी सकाळी एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch!कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र! त्यामुळे आता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर काही कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.

किरीट सोमय्या यांचे पीएमसी घोटाळ्यातील आरोपीशी संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या सगळ्याची कागदपत्रे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) देणार असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेकडून किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध तपासाची चक्रे फिरायला सुरुवात होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या संजय राऊत यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर सातत्याने आरोप करत होते. मात्र, मंगळवारी शिवसेना भवनात संजय राऊत यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. इतके दिवस इतरांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनाच राऊतांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे आता किरीट सोमय्या या सगळ्यावर काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल. किरीट सोमय्या हे थोड्याचवेळात पत्रकारपरिषद घेणार आहेत.

किरीट सोमय्या यांच्यावर आरोप

पीएमसी बँक घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान याचे किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. वाधवान हा सोमय्यांचा पार्टनर असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राकेश वाधवाने भाजपला २० कोटी रुपयांचा निधी दिला होता असा खळबळजनक आरोप करत या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना अटक करा अशी मागणी खासदार राऊत यांनी केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here