Uday Samant: आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांचा हल्ला

0

सोलापूर,दि.2: शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. कात्रज (पुणे) येथे उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला करून कारच्या काचा फोडल्या.

काही वेळापूर्वी युवासेनेचे आदित्य ठाकरे यांची सभा पुण्यात झाली. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सभा संपल्यानंतर शिवसैनिक जात असताना तेथूनच उदय सामंत यांच्या वाहनांचा ताफा जात होता. यावेळी शिवसैनिकांच्या उदय सामंत जात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याची भावना शिवसैनिकांची झाली आहे.

शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना हा हल्ला झाला. यावेळी शिवसैनिकांकडून ”गद्दार-गद्दार” अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

बंडखोरा आमदारांविरोधात हा उद्रेक फक्त आत्ताच पहायाला नाही मिळाला तर हे आमदार गुहाटीत असतानाही अनेकांचे कार्यालयं शिवसैनिकाकडून फोडण्यात आली होती. तर कित्येक आमदारांच्या पोस्टरलाही काळ फासण्यात आलं होतं. राज्यभर बंडखोर आमदारांविरोधात गद्दार म्हणत आंदोलनं पुकारण्यात आली होती. यावेळी ठिकठिकाणी पुतळे ही जाळण्यात आले होते. तो शिवसैनिकांमधला उद्रेक अजूनही शांत झालेला नाहीये तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे सध्या पुण्या दौऱ्यावरच आहेत आणि त्याचवेळी या गाडीवर झालेला हल्ला आता पुन्हा चर्चेत आला आहे. तर या शिवसैनिकांविरोधात एकनाथ शिंदे हे पोलिसांनी कठोर आदेश देण्याची दाट शक्यता आहे.

नक्की काय घडलं?
सामंत शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराच्या दिशेने जात होते. यावेळेस त्यांचा गाड्यांचा ताफा हा सिग्नलवर थांबलेला. यावेळेस इतर 2-3 गाड्यांमधून 20-25 जण आले. या हल्लेखोरांनी मला शिवीगाळ केली. यानंतर सामंतांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी या हल्लेखोरांना हटकलं. तेव्हा या हल्लेखोरांनी हॉकी स्टीकने गाडीच्या मागील बाजूने हल्ला केला. सामंतावंर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व दरम्यान सिग्नल सुटला. सिग्नल सुटला नाहीतर, माझ्यावरही हल्ला झाला असता, अशी भितीही सामंतांनी व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here