शरद पवार यांच्या घरावर हल्ला, परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलं मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.११: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) अचानक आंदोलन करत चप्पल व दगडफेक केली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्ने सदावर्ते (gunratan sadavarte) यांना अटक केली. तसेच प्रकरणी ज्या १०९ आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेणे शक्य नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी स्पष्ट केले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) म्हणाले की, राज्यातील सेवा परत सुरू करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. पाच महिने बंद असलेल्या बसगाड्या पूर्ववत करण्यासाठी बस आगारांनी तपासणी केली आहे. २२ तारखेपर्यंत जर संपकरी कामगार कामावर आले नाहीत तर कंत्राटी खासगीकरण करता येईल का, याचा विचार सुरू आहे. एसटी संचालक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होईल.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here