Home क्राइम ‘भोंदू’ अशोक खरातचा धक्कादायक ‘सेक्स स्कँडल पॅटर्न’ उघड; ५५ कोटींची मालमत्ताही रडारवर

‘भोंदू’ अशोक खरातचा धक्कादायक ‘सेक्स स्कँडल पॅटर्न’ उघड; ५५ कोटींची मालमत्ताही रडारवर

0

नाशिक,दि.२०: स्वतःला ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. महिलांवर अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे एकामागून एक भयानक वास्तव समोर येत असून, खरातचा शोषणाचा ‘पॅटर्न’ पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

असा होता शोषणाचा ‘पॅटर्न’

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरात महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी आध्यात्मिकतेचा आधार घ्यायचा. “मी कृष्णाचा अवतार असून तू मागील जन्मातील माझी राधा आहेस,” असे सांगून तो महिलांना भुलवत असे.

• पीडित महिलेसोबत येणाऱ्या व्यक्तीला तो ‘ध्यानस्थ पूजे’च्या नावाखाली केबिनबाहेर बसवून ठेवायचा.

• केबिनमध्ये महिलेला विशिष्ट चवीचे पाणी आणि पेढा देऊन गुंगी आणली जात असे.

• त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करायला लावून तो महिलांचे लैंगिक शोषण करत असे.

• नाशिक पोलिसांना खरातच्या कार्यालयातून १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ असलेले फुटेज आणि पेनड्राइव्ह मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

५५ कोटींची मालमत्ता आणि शिर्डी कनेक्शन

केवळ लैंगिक अत्याचारच नव्हे, तर खरातच्या अफाट संपत्तीचा आकडाही समोर येत आहे. नाशिकमधील ५० कोटींच्या जमिनीपाठोपाठ आता शिर्डीतही त्याची ५ कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. ही जमीन त्याने पत्नीच्या नावे खरेदी केल्याचा आरोप आहे. शिर्डीतील काही हॉटेल्स आणि लॉन्समध्ये त्याची निनावी भागीदारी असल्याची चर्चा असून, पोलीस आता त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही कसून चौकशी करत आहेत.

सेलिब्रिटी आणि राजकारण्यांशी जवळचे संबंध असलेल्या या भोंदू बाबाचे आणखी किती कारनामे बाहेर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.