Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? सत्य काय

0

दि.१४: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या सभेचा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता. यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या असा दावा करण्यात येत होता. खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या जयपूर (Jaipur) दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओसंदर्भात, नंदपुरी भागात ओवेसी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात येत होता. यानंतर आता, राजस्थानपोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत, सत्य समोर आणले आहे.

सत्य आले समोर

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची जेव्हा पोलिसांनी तपासणी केली, तेव्हा तेथे ओवेसी साहब झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातून समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सभेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये आवाज स्पष्ट नसल्याने पाकिस्तानसंदर्भात घोषणा दिल्याचा संभ्रम निर्माण होत होता. काही लोक हे व्हिडिओ चुकीच्या तथ्यांसह व्हायरल करत होते.’ अर्थात, पोलिसांच्या वक्तव्यानंतर हा Viral Video खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कारवाई होणार

यासंदर्भात बोलताना डीसीपी मृदूल कच्छावा म्हणाले, हा व्हिडिओ चुकीच्या तथ्यांसह पसरवणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. पत्रकारांसोबत बोलताना, कच्छावा म्हणाले, पोलिसांनी संबंधित दोन्ही व्हिडिओ अत्यंत बारकाईने तपासले आहेत. यात कुठलाही आक्षेपार्ह कंटेंट आढळलेला नाही. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here