‘देशातील जितके लुटेरे, डाकू, लफंगे, भ्रष्टाचारी आणि चोर आहेत ते सर्व आज…’ अरविंद केजरीवाल

0

नवी दिल्ली,दि.२९: आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशात ईडी आणि सीबीआयनं एक काम चांगलं केलं आहे. त्यांनी देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आज एकाच पक्षात एकत्र करुन सोडलं आहे. आज सारे भ्रष्टाचारी लोक भाजपामध्ये आहेत. त्यामुळे ज्या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. त्यादिवशी खऱ्या अर्थान देश भ्रष्टाचारमुक्त होईल, कारण सगळे भ्रष्टाचारी एकाच ठिकाणी असल्यानं त्यांना तुरुंगात धाडण्याचं काम सोपं होईल, असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी लगावला. ते दिल्लीच्या विधानसभेत बोलत होते. 

“ईडी, सीबीआयवाले येतात धाडी टाकतात. माथ्यावर बंदुक ठेवतात आणि तुरुंगात जायचंय की भाजपामध्ये जायचंय विचारतात. मनिष सिसोदियांच्या माथ्यावरही बंदुक ठेवली आणि असंच विचारलं गेलं. मनिष यांनी तुरुंगात जाणं पत्करलं पण भाजपात जाणार नाही सांगितलं. सत्येंद्र जैन यांच्याबाबतीतही असंच केलं. पण हेमंत बिसवा शर्मा, नारायण राणे, मुकुल रॉय, शुवेंद्रू अधिकारी यांनी चोरी केली होती. घोटाळे केले होते त्यामुळे त्यांनी माथ्यावर बंदुक ठेवताच भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला”, असं केजरीवाल म्हणाले. 

देशातील जितके लुटेरे, डाकू, लफंगे, भ्रष्टाचारी आणि चोर आहेत ते सर्व… अरविंद केजरीवाल

“देशातील जितके लुटेरे, डाकू, लफंगे, भ्रष्टाचारी आणि चोर आहेत ते सर्व आज भाजपामध्ये आहेत. वेळ काही सारखी राहत नाही. वेळ बदलते. आज मोदी पंतप्रधान आहेत. पण ते काही कायमस्वरुपी राहणार नाहीत. कधी ना कधी त्यांनाही जावच लागेल. त्यादिवशी खऱ्या अर्थानं भारत भ्रष्टाचारमुक्त होईल. कारण जितके चोर-भ्रष्टाचारी आहेत ते सगळे एकाच खोलीत आहेत. त्यांना पकडणं खूप सोपं होऊन जाईल. जास्त चौकशीची गरज पडणार नाही. त्यामुळे ज्या दिवशी मोदी पंतप्रधान राहणार नाही आणि भाजपाचं सरकार राहणार नाही. तेव्हा भाजपावाल्यांना तुरुंगात टाका हा देश भ्रष्टाचारमुक्त होऊन जाईल”, असंही केजरीवाल पुढे म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here