Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांचे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं विधान

0

मुंबई,दि.25: Arvind Kejriwal On Uddhav Thackeray: आम आदमी पार्टीचे प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी घेतली भेट | Arvind Kejriwal

अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. यानंतर आज आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

केजरीवाल यांचे सूचक विधान | Arvind Kejriwal On Uddhav Thackeray

या भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे.

आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही

अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. देशात फक्त एकच राजकीय पक्ष आहे, जो दिवसातील २४ तास निवडणुकांबाबत विचार करतो. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

आम्ही देशाचा विचार करतो. आमच्यासमोर देश आहे. देशातील बेरोजगार युवक आहेत. आमच्यासमोर शेतकरी आहेत. आमच्यासमोर गृहिणी आहेत. आमच्यासमोर महागाई आहे, अशा मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली असे केजरीवाल म्हणाले.

जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीचीही चर्चा करू. आम्ही राजकीय पक्ष आहोत. निवडणूक तर लढवूच. पण त्या (भाजपा) पार्टीप्रमाणे आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार नाही करत असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या पार्टीची चोरी झाली आहे. त्याच्या पक्षाचं चिन्ह चोरी झालं. त्यांच्या पक्षाचं नाव चोरी गेलं उद्धव ठाकरेंकडे जे काही होतं, ते सगळं चोरी करून नेलं’.

उद्धव ठाकरेंचे वडील वाघ

अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, उद्धव ठाकरेंचे वडील वाघ होते आणि हे वाघाचे पुत्र आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र यांच्याबरोबर आहे.’

त्यामुळे मी पूर्ण आशा करतो की, सर्वोच्च न्यायालयाकडून यांना संपूर्ण न्याय मिळेल. आणि आगामी प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरेंना प्रचंड यश मिळेल असेही केजरीवाल म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here