सोलापूर,दि.12: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ग्रंथालय संचालक पदाचे नेमणुकीसाठी राज्यातील 22 जणांचे मुलाखती 1 व 2 ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महूद येथील व साहाय्यक ग्रंथालय संचालक पदावर पुणे येथे कार्यरत असलेले दत्तात्रय क्षीरसागर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ग्रंथालय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे व उपाध्यक्ष धोंडिराम जेवूरकर यांनी दत्तात्रय क्षीरसागर यांचे अभिनंदन केले आहे. राज्यातील ग्रंथालय कर्मचारी यांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी दत्तात्रय क्षीरसागर हे शासन दरबारी नक्कीच काम करतील असेही बेडगे म्हणाले.