अंदली दमानिया यांचा गंभीर आरोप म्हणाल्या पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनी…

0

मुंबई,दि.५: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर गुरुवारी (दि.5) पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांनी विमान अपघाताबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनी मिळून तर काही केले नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अजित पवारांच्या निधनाचे त्यांना काहीच दु:ख दिसून येत नाही ते आपआपल्या कामात व्यस्त लगेच व्यस्त झाल्याचे म्हणत त्यांनी हा सवाल केला आहे.

मुंढवा (पुणे) जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चीट मिळूच शकत नाही असा दावा दमानिया यांनी केला. दमानिया यांनी पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यात झालेली पॉवर ऑफ अटर्नी देखील दाखवली. याचबरोबर त्यांनी चौकशी समितीला देखील इशारा दिला. 

अजित पवारांच्या निधनाचं वृत्त येताच प्रचंड हळहळ वाटल्याची भावना दमानिया यांनी व्यक्त केली. आताच्या घटकेला दु:ख इतकंच की त्यांच्या घरातली, जवळची , पक्षात काम करणारी माणसं यांना दु:ख का झालं नाही, यांना घाई का झाली? असं म्हणत शपथविधी आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  

महाराष्ट्रात सध्या जनमानसात प्रचंड संताप आहे, तो शपथविधीमुळं हा भाजपचा डाव होता की काय? असा वारंवार प्रश्न पडतो’, असाच सूर दमानियांनी आळवला. आपल्याला कोणाबद्दल सहानुभूती नाही, मात्र राजकारण इतक्या हीन दर्जावर जाईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र भाजपनं ते सिद्ध केल्याचं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here