Anil Deshmukh: अनिल देशमुखांची सुटका, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Anil Deshmukh स्वागताला सुप्रिया सुळे,अजित पवार उपस्थित

0

मुंबई,दि.28: Anil Deshmukh News Today: राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) तुरुंगाबाहेर आले आहेत. एक वर्ष आणि दोन महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली, यानंतर देशमुख यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Anil Deshmukh Latest News In Marathi)

स्वागताला सुप्रिया सुळे,अजित पवार उपस्थित | Anil Deshmukh News Today

अनिल देशमुख यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही आले होते. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. अनिल देशमुख बाहेर येणार, हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्याशिवाय आर्थर रोड तुरुंगाबाहेर कार्यकर्ते जमले होते. देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Anil Deshmukh News Today
अनिल देशमुख

ईडीने केली होती अटक | Anil Deshmukh Latest News

अनिल देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

जाहिरात

100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौखसी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता.

दरम्यान अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ मुंबईत आल्या आहेत. नागपूरमधलं हिवाळी अधिवेशन सोडून अजित पवार मुंबईत आले आहेत, यासाठी राज्य सरकारकडून अजित पवारांना स्पेशल चार्टर प्लेन देण्यात आलं.

अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर त्यांच्या स्वागतासाठी वरळीतल्या त्यांच्या घराबाहेर तसंच नागपूरच्या त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here