Android: अँड्रॉइड फोनचा वापर करताय हे कोड आहेत का माहिती?

0

या कोडचा असा करा वापर

दि.4 : Secret Code: स्मार्टफोन (Smartphone) वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारात अनेक प्रकारचे फोन उपलब्ध आहेत. अँड्रॉइड (Android) फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आयफोनपेक्षा (Iphone) अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांना अँड्रॉइड फोनमध्ये अनेक प्रकारची उपयोगात येणारी ॲप प्ले स्टोअरवर आहेत. सर्वाधिक ॲपही विनामूल्य आहेत. जवळपास सर्व व्यवहार आजकाल मोबाईलद्वारेच केले जातात.

अनेकवेळा फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते, तर काहीवेळा फोन हँग होतो. फोन जर वारंवार हँग होत असेल तर तो फॅक्टरी रिसेट करावा लागतो. अँड्रॉइड फोनमधील काही सिक्रेट कोड (Secret Code) विषयी माहिती असणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला स्वतःच फोनची स्थिती जाणून घेता येईल. सिक्रेट कोडचा वापर करून तुम्ही फोनचा IMEI क्रमांक, एसएआर व्हॅल्यू (SAR Value), स्टोरेज, बॅटरी, नेटवर्क स्टॅटिस्टिक आदी बाबी सहजपणे जाणून घेऊ शकता. तसेच एका सिक्रेट कोडच्या मदतीनं तुम्ही फोन रिसेटही करू शकता.

तांत्रिक बाबीची माहिती सिक्रेट कोडद्वारे (Secret Code) अँड्रॉइड फोन वापरकर्त्याला समजू शकते. त्यासाठी काही कोड (Code) माहिती असणे आवश्यक आहे. फोनमधील बॅटरी आणि नेटवर्कविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमधील डायल पॅडवर ##4636## हा सिक्रेट कोड टाइप करून डायल म्हणावं. त्यानंतर क्षणार्धात ही माहिती तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रिनवर दिसेल.

तुमच्या मोबाईलवरील कॅलेंडरने किती स्टोरेज (Storage) वापरलं आहे, हे तुम्ही जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अँड्रॉइड फोनमधील डायल पॅडवर (Dial Pad) ##225##* हा सिक्रेट कोड टाइप करावा लागेल. हा कोड डायल केल्यावर स्टोरेजची माहिती तुम्हाला स्क्रिनवर दिसेल.

अँड्रॉइड फोनची Specific Absorption Value जर तुम्हाला तपासायची असेल तर डायल पॅडवर *#07# टाइप करावे. हा सिक्रेट कोड टाइप केल्यावर काही क्षणातच तुम्हाला फोनची एसएआर व्हॅल्यू समजेल.

IMEI हा एक जनरल कोड अँड्रॉइड फोनसाठी असतो. मात्र हा कोड अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक असतं. हा कोड जाणून घेण्यासाठी फोनच्या डायल पॅडवर *#06# हा क्रमांक डायल करावा. त्यानंतर तुम्हाला फोनच्या स्क्रीनवर IMEI क्रमांक दिसेल.

हा कोड वापरताना काळजी घ्या. जर तुम्हाला अँड्रॉइड फोन रिसेट करायचा असेल तर तुम्ही फोनमधील डायल पॅडवर 27673855# हा क्रमांक डायल करावा. यामुळं तुमचा फोन फॅक्ट्री रिसेट होईल आणि तुमच्या फोनमधील सर्व डेटा जाईल. त्यामुळं हा सिक्रेट कोड डायल करण्यापूर्वी महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेणं गरजेचं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here