Anandraj Ambedkar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंबेडकर यांची साथ

0

मुंबई,दि.१६: Anandraj Ambedkar-Eknath Shinde News: महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि रिपब्लिकन सेनेने अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना पक्ष युती करत असल्याची अधिकृतपणे घोषणा केली.

काय म्हणाले आनंदराज आंबेडकर? | Anandraj Ambedkar-Eknath Shinde News

एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  हे वेगळे नेते असून ते सर्वांना सोबत घेऊन जातात. कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती करत आहोत. चळवळीतील नेत्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.

“महाराष्ट्रात झालेली ही युती आजची नाही, तर बाबासाहेबांपासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून सुरुवात झालेली युती आहे. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दोन कार्यकर्ते एकत्र आला आहोत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतानाही सर्वसामान्यांच्या सुखदुखाशी एकजूट होण्याचा प्रयत्न केला. अशा या कार्यकर्त्याबरोबर या देशामधील, महाराष्ट्रामधील आंबेडकरी समाज आहे. जो अनेक वर्षं रस्त्यावरील लढाई लढत आला. पण स्थानिक निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं,” असं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here